पाबळ:-प्रतिनिधी दि.8
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.मुंबई या पतसंस्थेच्या पुणे,सासवड,पिंपरी चिंचवड, आणि लोणावळा या पुणे जिल्यातील चार शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ शनिवार व रविवार दि.५ आणि ६सप्टेंबर २६ रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाव्हुणे म्हणून पुणे येथे मुख्याध्यापक महामंडळाचे मा.अध्यक्ष अरुण थोरात,शांताराम पोखरकर,टि.डी.एफ.राज्याध्यक्षजी.के.थोरात,शिवाजी किलकिले, शिवाजी शिंदे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड,सचिव शिवाजी कामथे,प्राचार्य रामदास थिटे, बाळासाहेब चव्हाण,सासवड येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,वसंतराव ताकवले,दत्तात्रय रोकडे,पिंपरी चिंचवड येथे गोदावरी हायस्कूलचे प्राचार्य ब्रजेश त्रिपाठी, प्राचार्य विजयकुमार
सोळुंके,बाबाजी शिंदे,शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद,दळवे सर,अशोक जाधव आणि लोणावळा येथे सुधागड तालुका जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयशिंगराव गोळे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड इ.मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.चंद्रकांत पाटील साहेब होते. अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन संस्था राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती सांगीतली. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केले तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर फक्त चांगल्या गोष्टीसाठी करा असे यावेळी सांगितले.यावेळी संस्थेचे मानद सचिव किशोर पाटील,सहसचिव सतीश माने ,खजिनदार सतेश शिंदे,तज्ञ संचालक गुलाबराव गवळे,जगन्नाथ जाधव ,सचिन नलावडे ,प्रमोद प्राचार्य तुकाराम बेनके,गोविंदराव सूळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी तर सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडे यांनी केले आणि आभार संचालक तुकाराम बेनके यांनी मानले.






