माजी अध्यक्ष बाळासाहेब ढमढेरे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदासाठी निवडणूक, एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) प्रतिनिधी: घनश्याम तोडकर
शिरूर तालुक्यातील नामांकित तळेगाव ढमढेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय किसन ढमढेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी अध्यक्ष बाळासाहेब लक्ष्मण ढमढेरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ यांनी काम पाहिले, तर सचिव कैलास लोहार यांनी कामकाज पाहिले.
अध्यक्षपदासाठी विजय ढमढेरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी संचालक मंडळ व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर ढमढेरे यांचा संचालक मंडळ व ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी उपसभापती अॅड. यशवंत ढमढेरे, अनिल भुजबळ, माजी अध्यक्ष पोपट भुजबळ आदींनी मनोगत व्यक्त केले. विजय ढमढेरे हे उच्चशिक्षित असून यांनी तळेगाव ढमढेरे गावचे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच ,म्हणून अनेक वर्ष गावामध्ये प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. जनसामान्यांमध्ये स्वच्छ प्रतिमा, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व, जनसामान्याच्या हक्के ला जाऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. निवडीनंतर बोलताना ते म्हणाले. सर्वांनी जी मला जबाबदारी दिली आहे त्या संधीचे नक्कीच सोने करील सर्व सभासदांना व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय ढमढेरे यांनी यावेळी सांगितले.





