आणेवारीचे काम सांगण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याची फिर्याद*
शिरूर | प्रतिनिधी घनश्याम तोडकर
शिरूर तालुक्यातील संविदणे येथे एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे संविदणे हद्दीत संविदणे ते कवठे येमाई रस्त्यालगत असलेल्या शिंदे मळा येथील पर्णकुटीमध्ये ही घटना घडली. आणेवारीचे काम कसे पूर्ण करायचे हे सांगण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी जवळ बसून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले, अशी तक्रार फिर्यादी महिलेने दिली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी सुभाष नाथा कामठे, रा. संविदणे, ता. शिरूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र चव्हाण हे करीत असून दाखल अंमलदार पोलीस हवालदार शिंदे आहेत





