शिरूर | प्रतिनिधी – घनश्याम तोडकर
शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी एका महिलेला कटरने मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलिसात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी लकी दिवटे, प्रतिक्षा दिवटे व इतर तिघांमध्ये वाद झाला. या वादात शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीच्या हातावर कटरने वार करून दुखापत करण्यात आली. तसेच फिर्यादीस सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पतीलाही मारहाण करण्यात आली.
या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पो.हवा. खेडकर हे करीत आहेत.







