तळेगांव ढमढेरे (लक्ष्मी रोड) येथे ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रतिनिधी घनश्याम तोडकर
तळेगांव ढमढेरे, ता. शिरूर – येथील सावता ग्रुप युवा प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १८ व्या नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे अश्विन शुद्ध १ शके १९४८, रविवार दि. ११/१०/२०२६ ते मंगळवार दि. २०/१०/२०२६ या कालावधीत हा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होणार आहे.
संस्थेची स्थापना २००९ साली झाली असून गेल्या १८ वर्षांपासून तळेगांव ढमढेरे व पंचक्रोशीतील सर्व देवी भक्त व देणगीदार यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव अविरत सुरू आहे.
अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा
- दि. ११/१०/२०२६ रविवार (माळ १) : सकाळी ११.०० वा. मंगलमूर्ती साऊंडच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक व घटस्थापना. रात्री ८ वा. सावता महाराज दिंडी सोहळा व गणेश मंदिर यांचा भजनाचा कार्यक्रम.
- दि. १२/१०/२०२६ सोमवार (माळ २) : सायं. ८ वा. तालविश्व अभंगवाणी विशारद केतन देव्हरकर (तळेगाव ढमढेरे) यांचा कार्यक्रम.
- दि. १३/१०/२०२६ मंगळवार (माळ ३) : सायं. ८ वा. महिलांसाठी विशेष आकर्षण – होममिनिस्टर-खेळ पैठणीचा. निवेदिका – ईश्वरीताई खैरे. प्रत्येक सहभागी महिलेस उत्तेजनार्थ बक्षीस.
- दि. १४/१० /२०२६ बुधवार (माळ ४) : सायं. ८ वा. जय भवानी गायन पार्टी, विठ्ठलवाडी यांचा कार्यक्रम.
- दि. १५/१०/२०२६ गुरुवार (माळ ५) : सायं. ८ वा. शारदाई क्रिएशन्स अभिजित पवार प्रस्तुत – लोककलेची वारी, लय भारी (पुणे).
- दि. १६/१०/२०२६ शुक्रवार (माळ ६) : सायं. ८ वा. एकतारी भजन संध्या.
- दि. १७/१०/२०२६ शनिवार (माळ ७) : सायं. ७ वा. होमहवन व पूजा. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम (श्री. अशोक काका पाठक). महाप्रसाद सौजन्य – श्री. राहुलदादा गव्हाणे (मा. सरपंच, डिग्रजवाडी). यानंतर जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी, प्रा. प्रा. अमोल मगर यांचा देवीच्या गाण्याचा कार्यक्रम.
- दि. १८/१०/२०२६ रविवार (माळ ८) : सायं. ८ वा. नवरात्र फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रम.
- दि. १९/१०/२०२६ सोमवार (माळ ९) : सायं. ८ वा. पारंपारिक दांडिया.
- दि. २०/१०/२०२६ मंगळवार (माळ १०) : सकाळी ९ नंतर देवीची भव्य मिरवणूक (अमर ब्रॉस बँड, बारामती).
या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ तळेगांव ढमढेरे, संत सावता महाराज मंगल कार्यालय, पोलीस स्टेशन तळेगांव ढमढेरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगांव ढमढेरे तनया मंडप डेकोरेशन यांचे मोलाचे सहकार्य दरवर्षी मिळत असते
सावता ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व आयोजकांनी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी नवरात्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष यशवंत नरके उपाध्यक्ष सुभाष भुजबळ ओमकार घुमटकर रघुनाथ डोके विष्णू डेंगळे शुभम भुजबळ हेमंत काणेकर विनायक पिंगळे वैभव डोके चैतन्य भूमकर विराज कदम मेघराज डोके समीर केदारी मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे……







