तळेगाव ढमढेरे,
प्रतिनिधी घनश्याम तोडकर
-* शिरूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची समजली जाणारी तळेगाव ढमढेरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सन 2025/ 26 आर्थिक वर्षात संस्थेला 29 लाख 63 हजार रुपये नफा झालेला असून संस्थेचे काम उत्तम चाललेले असून ऑडिट वर्ग अ आहे.. संस्थेचे सर्व सभासद संचालक मंडळ कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळेच संस्था प्रगतीपथावर असल्याचे आदर्श चेअरमन बाळासाहेब लक्ष्मणराव ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब नरके, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. यशवंत आबा ढमढेरे, रावसाहेब दादा पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. पोपट भाऊ भुजबळ,व्हाईस चेअरमन सौ. कमल बबन भुजबळ व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीकांत सातपुते, वि.का.सो. मा. चेअरमन सुभाष नाना ढमढेरे, तळेगावचे मा. उपसरपंच श्री. बाळासाहेब जनार्धन ढमढेरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोसायटीचे मार्गदर्शक सचिव श्री. कैलास लोहार यांची महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी पतसंस्थेच्या सुलभ सक्षमीकरणासाठी नेमलेल्या अभ्यास गटावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श चेअरमन बाळासाहेब दादा ढमढेरे यांचाही सन्मान करण्यात आला. हा सत्कार श्रीकांत सातपुते यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. संतोष भुजबळ व तज्ञ संचालक शहाजी काका ढमढेरे यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मा. चेअरमन रामभाऊ ढमढेरे, संतोष विजय ढमढेरे, ज्ञानेश्वर भुजबळ, श्रीपती अण्णा भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र घुमे, विजय पाटील ढमढेरे, दशरथ शेलार, पुष्पा अर्जुन भुजबळ, संदीप ढमढेरे, सुनील सुरेश ढमढेरे, रविंद्र जेधे, सुधीर भुजबळ, रमेश भुजबळ, बबनराव भुजबळ, अनिल पांडुरंग भुजबळ, एकनाथ साबळे, वसंत भुजबळ, सोपानराव शिंदे, उमेश भुजबळ, मानसिंग ढमढेरे, किसन पाटील, संजय भुजबळ, नितीन भुजबळ, गोविंदराव भुजबळ, अर्जुनराव भुजबळ, शंकर भुजबळ, बाबासाहेब भुजबळ, दादाभाऊ नरके, राजेंद्र केदारी, प्रकाश तोडकर, बाळासाहेब शिवाजी ढमढेरे, सचिन बाळसराफ, हर्षल साखरे, सौ. विशाखा फुलारी यांच्यासह अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील शिवाजी भुजबळ यांनी केले.
संस्थेच्या वतीने यावर्षी सभासदांना १२% लाभांश जाहीर करण्यात आला असून, सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती सचिव कैलास लोहार यांनी दिली झालेल्या निर्णयाचे सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आभार मानले.







