त्यानंतर विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी केले.याप्रसंगी विषय पत्रिकेचे विषयानुसार वाचन सुरू असताना सुधीर फराटे,काकासाहेब खळदकर,सुरेश पालांडे,किशोर फराटे,तात्या शेलार यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.दरम्यान काही सभासदांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यामुळे सभा कोणत्याही निर्णयाविना राष्ट्रगीताने आटोपती घ्यावी लागली.
यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत मंगेश ढवळे यांनी केले.तसेच सभास्थळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कारखाना सत्ताविरोधी गटाकडून निषेध सभा….
दरम्यान घोडगंगेची वार्षिक सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर कारखान्याच्या सत्ताविरोधी गटाने नियोजित सभास्थळाबाहेर निषेध सभेचे आयोजन केले होते.यावेळी दादापाटील फराटे,बाबासाहेब फराटे,आबासाहेब गव्हाणे, काकासाहेब खळदकर,शशिकांत दसगुडे,सुधीर फराटे,राजेंद्र जासूद,श्रीनिवास घाडगे, बाळासाहेब घाडगे,सचिन मचाले,बबन वाळके,तात्या शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक उपस्थितांनी निषेध व्यक्त केला.
घोडगंगा कारखाना चालवायचा जमत नसेल तर राजीनामे द्या – सत्ताधारी गटाला विरोधी गटाकडून आव्हान
प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबत नोटीस बजावली आहे. कारखान्याने ‘एनसीडीसी’कडे सादर केलेला कर्जमागणीचा प्रस्तावदेखील अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकारण्यात आला आहे.
कारखाना कामकाजात कुठलेही राजकारण न आणता राज्य शासनाच्या प्रतिनिधींशी, स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी भूमिका दादापाटील फराटे यांनी मांडली. कर्जासाठी गहाण ठेवलेल्या संचालकांच्या जमिनींवर बोजे चढले. या स्थितीत एकमेकाला दोष देत बसण्यापेक्षा, आमदारांवर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा कारखाना कसा सुरू करता येईल, या विषयाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, राहुल पाचरणे, विश्वास ढमढेरे,शिरूर तालुकाध्यक्ष वीरेंद्र शेलार, शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर,शिरूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष पूजा भुजबळ,शिक्रापूर नगरीचे उपसरपंच मयूर करंजे,पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे, सदस्य दीपक पवार, माजी सदस्य राजेंद्र गदादे व रामभाऊ कदम, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, कुंडलिक शितोळे, रघुनंदन गवारे , राहुल पवार आदी मान्यवरांसह संचालक मंडळ व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.







