*शिक्रापूर,
प्रतिनिधी घनश्याम तोडकर
क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या किरकोळ कारणावरून शिक्रापूरमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. चौकात बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
शिक्रापूर येथील चाकण चौकाजवळील तळेगाव रोडवर क्रिकेट खेळण्यावरून हा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. आरोपींनी जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट व स्टंपने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेत दुखापत झाल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी महाबळेश्वर नगर, शिक्रापूर येथील मकसुद जाफरअली खान (२६), हमीद रियाज खान (२५), सलामत जाफरअली खान (२८), बिलाल बरकतअली खान (२२) आणि जावेद मुस्ताक शहा (२२) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, हवालदार अमोल दांडगे, बापू हाडगळे, शिवाजी चितारे, कॉन्स्टेबल नारायण वाळके, विकास बांगर, मच्छिंद्र निचीत आणि संतोष बाबर यांनी सहभाग घेतला.







