तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) | प्रतिनिधी – घनश्याम तोडकर
दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या घरात गोडवा यावा यासाठी व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि. ने मोठा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या २५ रुपये प्रति किलो दराने शेअर्स रक्कम व ऊस पुरवठा नुसार साखर वाटप सुरू करण्यात आले असल्याचे कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी बातमीदारांशी बोलताना माहिती दिली.. चालू हंगामातही जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी पूर्वतयारी केली असून शेतकऱ्यांना ऊसाला एफ आर पी नुसार चांगला दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा आपल्या व्यंकटेश कृपा शुगर मिलला करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.
सर्व सभासद व ऊस पुरवठादार यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ९ ते सायं. ४ वाजेपर्यंत तळेगाव ढमढेरे (शेतकी गट ऑफिस) येथे चालू केले आहे. तळेगाव ढमढेरे, दरेकरवाडी, सणसवाडी, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, पारोडी, शिवतक्रार, मळुंगी या गावातील शेतकऱ्यांनी ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


